Right time to gym : जिम लावण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या!
आजकाल च्या व्यस्त जीवनात लोकांना त्यांच्या फिटनेससाठी वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत आज 24/7 जिम ची पद्धत सुरू झाली आहे. याचा अर्थ जेव्हा तुमच्याकडे मोकळा वेळ असेल तेव्हा तुम्ही जिम करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवसाच्या कोणत्याही वेळी व्यायाम करणे चांगले आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की सकाळी व्यायाम करणे सर्वोत्तम आहे. [Photo Credit : Pexel.com]
सकाळचा व्यायाम का महत्त्वाचा आहे?चयापचय सुधारा :सकाळी व्यायाम केल्याने तुमची चयापचय क्रिया सुधारते. चयापचय सुधारल्याने तुमच्या कॅलरी बर्निंगला गती मिळते. [Photo Credit : Pexel.com]
त्यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होतेच, पण तुमची पचनक्रियाही सुधारते. अशा परिस्थितीत आपले एकंदर आरोग्य सुधारते. [Photo Credit : Pexel.com]
शारीरिक सोबत मानसिक तंदुरुस्ती:तुमच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी सकाळचा व्यायाम महत्त्वाचा आहे. यामुळे मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढतो. [Photo Credit : Pexel.com]
लक्ष केंद्रित करणे, एकाग्रता आणि सतर्कता यासारख्या क्षमता सुधारतात. तुमची सर्जनशीलताही वाढते. त्याचा तर्कशक्तीवरही सकारात्मक परिणाम होतो. [Photo Credit : Pexel.com]
फ्रेश वाटेल :सकाळची ताजी हवा तुमचे शरीर तसेच मूड फ्रेश ठेवण्यास मदत करते. सकाळी व्यायाम केल्याने शरीरात एन्डॉर्फिन आणि कॉर्टिसॉल हे फील-गुड हार्मोन्स बाहेर पडतात. [Photo Credit : Pexel.com]
त्यांच्या मदतीने तुमची चिंता, तणाव आणि नैराश्य कमी होते. त्यातून तुमच्यात सकारात्मकता येते. [Photo Credit : Pexel.com]
निद्रानाशाची तक्रार दूर होईल : सकाळी नियमित व्यायाम केल्याने तुमची झोपेची पद्धत सुधारते. यामुळे निद्रानाश सारख्या समस्येपासून आराम मिळतो. रात्री वेळेवर झोपल्याने आणि सकाळी वेळेवर उठल्याने तुम्हाला फ्रेश वाटेल. [Photo Credit : Pexel.com]
रोगप्रतिकारशक्ती वाढेल : नियमित व्यायामामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते. पण सकाळी लवकर व्यायाम केल्याने पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये अधिक मदत होते. ज्यामुळे शरीर अनेक प्रकारच्या संसर्ग आणि विषाणूंपासून सुरक्षित राहते. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]