Egg Benefits : रोज एक किंवा दोन अंडी खाल्ल्याने शरीराला मिळतात अनेक फायदे; जाणून घ्या
तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही अंड्याचं सेवन करू शकता. अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात जे दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. अंड्यांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने असल्यामुळे हाडांशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.
अंडी खाल्ल्याने डोळ्यांनाही फायदा होतो. यामध्ये असलेले पोषक घटक मॅक्युलर डिजेनेरेशनची समस्या टाळण्यास मदत करतात. अ जीवनसत्वाचे प्रमाण डोळ्यांची दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करतात.
अंडी मेंदूसाठी खूप फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. अंड्यांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन बी 12 असते ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
जर तुम्ही सकाळी अंड्याचं सेवन केलं तर तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहू शकता. त्यामध्ये सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी कार्य करू शकतात.
अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रथिने आणि अमिनो अॅसिडचे प्रमाण आढळते. हे पोषक घटक शरीरातील स्नायू तयार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12 आणि सेलेनियम अंड्यांमध्ये आढळतात. जे रोग प्रतिकारशक्ती वाढवून तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.
अंड्याचे सेवन केल्याने केस आणि नखांना फायदा होतो. यामधील बायोटिनमुळे केस मजबूत होतात आणि नखे तुटण्याची समस्या देखील टाळता येते.