झणझणीत, मसालेदार खाणाऱ्यांनो सावधान! जीभेचे चोचले शरीरासाठी ठरतील घातक
मसाल्याच्या नियमित सेवनाने शरीर थंडीच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित राहते आणि शरीरात ऊर्जाही टिकून राहते. मात्र, त्यांचा अतिवापर शरीरासाठी घातक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. (PC:istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमसाले अतिप्रमाणात खाल्ल्याने चयापचय क्रिया मंदावते आणि अन्न पचण्यास उशीर होतो.मसाल्याचे सेवन जास्त केल्ल्याने पोटात जळजळ, गॅस आणि ॲसिडिटी होऊ शकते. याचा पचन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. (PC:istock)
उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी दालचिनी आणि लवंगाचे जास्त सेवन करणे धोकादायक ठरू शकते. हे मसाले रक्ताभिसरण वाढवण्याचे काम करतात, ज्यामुळे समस्या गंभीर होऊ शकते.काळी मिरी आणि तिखट यांसारखे मसाले जास्त खाल्ल्याने घशात जळजळ, घसा खवखवणे अशा समस्या निर्माण होऊन घशाला सूज येऊ शकते. (PC:istock)
जास्त मसाले खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त उष्णता वाढवते, ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या वाढू शकतात. यामुळे त्वचेवर ऍलर्जी, खाज सुटणे, पुरळ उठणे किंवा इतर समस्या उद्भवू शकतात याशिवाय आहारात मसाल्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश केल्याने यकृत आणि किडनीवर दबाव पडतो. (PC:istock)
थंडीच्या मोसमात अनेक आजार डोकंवर काढतात, अशावेळी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज असते, त्यामुळे हिवाळ्यात शक्य तितकीया फळे, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थ खा. (PC:istock)
याशिवाय थंडीच्या मोसमात जास्त मसालेदार पदार्थ खाणे, टाळण्याचा प्रयत्न करा. (PC:istock)
शरीर हायड्रेटेड ठेवा. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी नियमित प्या. (PC:istock)
तुमच्या जीवनशैलीत व्यायामाचा नक्कीच समावेश करा. (PC:istock)
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत. (PC:istock)