Eating rice : सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खावा की नाही जाणून घ्या!
दक्षिण आशियाई प्रदेशात राहणाऱ्या लोकांना भात खायला खूप आवडतो. अनेकांना रोटीपेक्षा भात खायला जास्त आवडतो. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्दी आणि खोकल्यादरम्यान विषाणूजन्य ताप येण्याचा धोका लक्षणीय वाढतो.त्यामुळे हिवाळ्यात खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी.[Photo Credit : Pexel.com]
सर्दी-खोकला झाल्यास भात खावा की नाही? सर्दी किंवा खोकल्याचा त्रास असलेल्यांनी चुकूनही भात खाऊ नये. कारण त्यामुळे ताप येऊ शकतो.सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खाल्ल्याने कफ जमा होतो. [Photo Credit : Pexel.com]
अशा स्थितीत भात खाल्ल्याने त्रास वाढू शकतो.त्यामुळे खोकला आणि सर्दी झाल्यास चुकूनही भात खाऊ नये. [Photo Credit : Pexel.com]
रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते: सर्दी-खोकल्यामध्ये भात खाल्ल्यास कफ वाढू लागतो.ज्यामुळे शरीर हळूहळू कमकुवत होऊ लागते. [Photo Credit : Pexel.com]
त्यामुळेच कफ जास्त वाढल्याने फुफ्फुसे कमकुवत होतात आणि रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते. त्यामुळे सर्दी-खोकल्यादरम्यान भात न खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. [Photo Credit : Pexel.com]
सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खाण्याचे तोटे : सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खाल्ल्याने खोकला वाढू शकतो. यामुळे तुमच्या शरीराला मोठी हानी होऊ शकते. [Photo Credit : Pexel.com]
भातामध्ये कफ तयार करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे ते खाण्यास मनाई आहे. सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खाल्ल्याने शरीराचे तापमान कमी होते म्हणजेच शरीर थंड होऊ लागते. [Photo Credit : Pexel.com]
भाताचा स्वभाव थंड असतो. हे खाल्ल्यानंतर समस्या वाढू शकते. सर्दी-खोकला झाल्यास गरम अन्न किंवा पेय घ्यावे असे अनेकदा सांगितले जाते. [Photo Credit : Pexel.com]
थंड किंवा शिळा भात खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. खोकला आणि सर्दीपासून सुटका हवी असेल तर काही दिवस भात खाणे बंद करा. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]