सोनं चांदी खरेदी करण्याची मोठी संधी, दरात झाली घसरण
image 2
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे..
आज पुन्हा सोन्या चांदीच्या दरात घसरण झालीय. त्यामुळं सोने आणि चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळाली आहे.
बुलियन मार्केट (Bullion Market) या वेबसाइटर दिलेल्आ माहितीनुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत ही 71790 रुपये आहे. मागच्या ट्रेंडमध्ये याच सोन्याची किंमत ही 71910 रुपये प्रति 10 ग्रॅम होती.
एका बाजूला सोन्याच्या दरात घसरण होत असताना दुसऱ्या बाजूला चांदीच्या दरात देखील घसरण झालीय. चांदीचा दर हा 90930 रुपये प्रति किलो आहे.
मागील ट्रेंडमध्ये हाच चांदीचा दर हा 91390 रुपये प्रति किलो होता. आज यामध्ये चांगलीच घसरण झाल्याचे पाहयला मिळत आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर हा 65688 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 10 ग्रॅमसाठी 71660 आहे.
गेल्या अनेक दिवसापासून सातत्यानं सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
वाढत्या सोन्याच्या दरामुळं सोन्याची खरेदी करावी की नको? असा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण होत होता. मात्र आता दरात घसरण झाली आहे.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या काळात सोन्या चांदीच्या खरेदीत मोठी वाढ होत असते. मात्र, दरात वाढ होत असल्यानं नागरिक खरेदीकडे पाठ फिरवताना दिसत होते.