आयटीआर भरताना 'या' चुका कधीच करू नका, अन्यथा येऊ शकते प्राप्तिकर विभागाची नोटीस!
IT Return: सध्या प्राप्तिकर परतावा भरण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. त्यामुळे नोकरदार, उद्योजक त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कागदपत्रे गोळा करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, तुम्ही पहिल्यांदाच प्राप्तिकर परतावा भरत असाल तर काही काळजी घेणे गरजेचे आहे. कारण प्राप्तिकर भरताना काही चुका केल्यास तुम्हाला तो महागात पडू शकतो.
सध्या वित्त वर्ष 2023-24 तसेच असेसमेंट वर्ष 2024-25 साठी प्राप्तिकर परातावा भरता येणार आहे. आईटीआर भरताना स्वत:ची माहिती काळजीपूर्वक भरायला हवी. स्वत:चे नाव, पॅन डिटेल्स, बँक खात्याची माहिती आदी माहिती कोणतीही चूक न होऊ देता भरावी.
तसेच आयटीआर फाईल करताना योग्य फॉर्मची निवड करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास किंवा चुकीचा फॉर्म निवडल्यास आर्थिक दंड भरावा लागू शकतो.
आयटीआर फाईल करताना पगार, व्याजातून होणारी कमाई, घरभाड्यातून मिळणारे उत्पन्न आदी माहिती लपवल्यास तुम्हाला दंड लागू शकतो.
टीडीएस क्रेडिट व्यवस्थित चेक न केल्यास तुम्हाला प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळू शकते. तुम्ही कर्मचारी असाल तर तुम्हाला कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या फॉर्म 16/16 ए वर सर्व टीडीएसची माहिती दिलेली असते. त्यामुळे ही माहिती समोर ठेवूनच टीडीएस भरावा.
वेळेवर आयटीआर न भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे शेवटपर्यंत वाट न पाहता, लवकरात लवकर आयटीआर भरावा.
उत्पन्न कमी दाखवल्यावरदेखील तुम्हाला प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळू शकते. त्यामुळे आयटीआर वेळेत आणि योग्य काळजी घेऊन भरावा.