Grains Benefits : हिवाळ्यात रोज खा हे 'चार' प्रकारचे धान्य; थंडीत रहा उबदार!
हिवाळ्यात ही धान्ये खूप फायदेशीर मानली जातात. त्यांचे सेवन केल्याने आजार शरीराला स्पर्शही करत नाहीत. थंड हवामानात या चार जाड धान्यांचा आहारात अवश्य समावेश करा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात कपडे घालण्यापासून खाण्यापर्यंत सर्व काही बदलते. स्वत:ला उबदार ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतात आणि हेल्दी खाण्यास सुरुवात करतात.
हिवाळ्यात बाजरी देखील खूप फायदेशीर मानली जाते. त्यांचे सेवन केल्याने आजार शरीराला स्पर्शही करत नाहीत.
थंड हवामान, तंदुरुस्ती आणि आजारांपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर हिवाळ्यात आपल्या आहारात बदल करणे गरजेचे आहे .
ज्वारी : ज्वारी अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. यात व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिन सारखे घटक असतात. त्यामुळे ज्वारी चयापचय वाढवून केस आणि त्वचेला फायदा करते. त्याचबरोबर मॅग्नेशियम हाड आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. यात आढळणारे फायबर आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. रक्तातील साखरेची पातळी टिकवून वजन कमी करण्यासही ज्वारी उपयुक्त आहे.
सातू : सातू फायबर, प्रथिने, थायमिन, राइबोफ्लेविन, नियासिन, फोलेट, लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि तांबे यांनी समृद्ध आहे. खाण्यापूर्वी सातू कमीत कमी चार तास पाण्यात भिजवून ठेवावी, असे पोषणतज्ञांचे म्हणणे आहे. यानंतर पुलाव, कोशिंबीर किंवा इतर कोणतीही वस्तू बनवून खाऊ शकता. सातूच्या पिठाची भाकरी देखील फायदेशीर मानली जाते.
सावा :सावा हे भारतातील सर्वात जुन्या पिकांपैकी एक आहे आणि हा वरईचाच एक प्रकार आहे. त्यास वरी, कुटकी या नावांनीही ओळखले जाते. दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे सावा हे प्रमुख अन्न आहे. साव्याला बार्नयार्ड बाजरी असेही म्हणतात. नाचणीप्रमाणे ८ तास पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर त्याचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. त्यासोबत डोसा, पुलाव किंवा खिचडी बनवू शकता. यात फायबर, कॅल्शियम, लोह भरपूर प्रमाणात असतात.