Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 'या' मसाल्याचा चहा प्या, तुम्हीही जॉन अब्राहमसारखे फिट व्हाल!
सध्या वजन वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. ऑफिसनंतर वेळ काढणे आणि जिममध्ये तासनतास घाम गाळणे सर्वांनाच शक्य नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हाला माहित आहे का आल्याचा चहा प्यायलो तर वजन कमी करणे सोपे होईल.
आल्याचा चहा पोटाची चरबी वितळवण्यात खूप प्रभावी ठरू शकतो. प्रथम आपण आपल्या स्वयंपाकघरात हा हर्बल चहा कसा तयार करू शकता हे जाणून घेऊया.
साहित्य: पाणी - अर्धा कप, दूध - अर्धा कप ,चहाची पाने - एक चमचे, आले पावडर - 1 टीस्पून, छोटी वेलची - अर्धा टीस्पून, लवंग किंवा लवंग पावडर - अर्धा टीस्पून
प्रथम एका सॉसपॅनमध्ये पाणी उकळवा आणि त्यात दूध, चहाची पाने, छोटी वेलची मिसळा. थोड्या वेळाने त्यात आल्याची पूड टाका.
साधारण 15 मिनिटे मंद आचेवर उकळा. आता गॅसची आच बंद करा आणि गाळणीच्या मदतीने चहा गाळून घ्या आणि कपमध्ये सर्व्ह करा.
जे लोक रोज एक कप आल्याचा चहा पितात, त्यांची पचनक्रिया चांगली राहते आणि चयापचय वाढतो, वजन कमी करण्यासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. अदरकमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फोलेट ऍसिड, फॅटी ऍसिड, फायबर आणि सोडियम आढळतात, जे शरीरासाठी सर्व प्रकारे फायदेशीर आहे.
लक्षात ठेवा आल्याच्या चहामध्ये साखर मिसळू नका, अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (फोटो सौजन्य : unsplash.com/)