Apple Side Effects: तुम्हालाही सफरचंद खायला आवडते का ? जाणून घ्या जास्त सफरचंद खाणे आरोग्यासाठी आहे धोकादायक !
सफरचंद खाल्ल्याने आरोग्याला कसा फायदा होतो हे तुम्ही अनेकदा ऐकलं आणि वाचलं असेल. मात्र यामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोषक तत्वांनी समृद्ध असलेली ही फळे आपल्याला अनेक गंभीर हानी देखील पोहोचवू शकतात. यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम, फायबर, लोह आणि मॅग्नेशियम असले तरी जर त्याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर ते आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. अशापरिस्थितीत त्यातील काही गंभीर गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे . (Photo Credit : pexels )
जास्त सफरचंद खाल्ल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळत असल्याने त्याच्या अतिसेवनामुळे गॅसची तक्रार होऊ शकते. (Photo Credit : pexels )
तसेच यामुळे पोटदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात. तज्ञांच्या मते, आपल्या शरीराला दिवसातून फक्त 20-40 ग्रॅम फायबरची आवश्यकता असते. हे प्रमाण वयानुसार थोडे कमी-अधिक असू शकते, परंतु दिवसातून 70 ग्रॅमपेक्षा जास्त फायबर घेतल्यास पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.(Photo Credit : pexels )
सफरचंदात पोटॅशियम, फायबर, लोह, कार्बोहायड्रेट आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळीही वाढू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात सफरचंद खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते .(Photo Credit : pexels )
एका अभ्यासानुसार सफरचंदांमध्ये कीटकनाशकेही आढळतात. यात डायफेनिलामाइन नावाचे रासायनिक कंपाऊंड असते ज्यावर युरोपियन युनियननेही बंदी घातली आहे. सोप्या भाषेत जास्त सफरचंद खाल्ल्याने शरीराला या रसायनाचा धोका वाढतो, म्हणून ते जास्त खाणे टाळा. (Photo Credit : pexels )
तुम्हालाही सफरचंद खाण्याचा छंद असेल तर ते जास्त खाल्ल्याने तुमचे वजनही वाढू शकते. (Photo Credit : pexels )
एक लहान सफरचंद 25 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 5 ग्रॅम फायबरसाठी जबाबदार आहे. यामुळे त्यांच्या अतिसेवनामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते, कारण तुमचे शरीर एवढ्या मोठ्या प्रमाणात चरबी जाळण्यास सक्षम नसते.(Photo Credit : pexels )
तुम्हाला माहित आहे का की सफरचंद सोड्यापेक्षा जास्त आम्लयुक्त असतात? अशावेळी जास्त प्रमाणात सफरचंद खाल्ल्याने दात खराब होऊ शकतात, जे तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले ठरणार नाही.(Photo Credit : pexels )
एका दिवसात दोन नॉर्मल आकाराचे सफरचंद खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापेक्षा जास्त सफरचंद खाल्ले तर त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होऊ शकते.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )