PHOTO : मनोज जरांगेंसाठी 'मराठे एकवटले'; आंदोलनातील अंगावर शहारे आणणारे दृष्य
जालना, बीड आणि अहमदनगर असे तीन जिल्ह्यांचा प्रवास करून जरांगे पुणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिसऱ्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीचा मुक्काम त्यांनी रांजणगाव गणपती येथे केला. आज सकाळी पुन्हा 10 वाजता जरांगे हे लाखो मराठ्यांसह मुंबईकडे निघाले असून, आज रात्रीचा मुक्काम पुण्यातच होणार आहे.
आज दुपारच भोजन भीमा कोरेगाव येथे केले जाणार आहे. तर, आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील चंदननगर येथे केला जाणार आहे. आज आणि उद्याचा प्रवास करून 26 जानेवारीला मनोज जरांगे मुंबईत धडकणार आहे.
मनोज जरांगे यांची पायी दिंडी पुण्यात दाखल झाली आहे. मनोज जरांगे यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातील आंदोलक त्यांच्या पायी दिंडीत सहभागी झाले आहेत.
या आंदोलनात मराठवाड्यासह विदर्भातील मराठा समाजबांधव सहभागी होतांना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण पायी दिंडीत तरुणांसह वयस्कर नागरिक देखील मोठ्याप्रमाणात पाहायला मिळत आहे.
आंदोलनात सहभागी मराठा बांधवांनी राहण्याची आणि खाण्या-पिण्याची देखील सर्व सोय आपल्या गाडीतच केली आहे.
आंदोलनाला उशीर झाल्यास अन्नधान्य कमी पडू नयेत यासाठी त्यांनी एक महिना पुरेल एवढ्या प्रमाणात गरजेचे गोष्टी आणल्या आहेत.
तर आता कितीही दिवस लागले तरीही आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नसल्याची भूमिका या आंदोलकांनी बोलून दाखवली.
या आंदोलनात सहभागी झालेला प्रत्येक आंदोलन मिळेल त्या गाडीने दाखल होतांना पाहायला मिळत आहे. तसेच, आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेणार नसल्याची भूमिका प्रत्येकजण बोलावून दाखवत आहेत.