Drink Less Water Causes : हिवाळ्यात तुम्हीही कमी पाणी पिताय? जाणून घ्या होणारे नुकसान!
हिवाळा सुरु झाला की बऱ्याचदा आपोआप आपले पाणी पिणे कमी होऊन जाते परंतु यामुळे आपल्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात थंडीमुळे आपण अनेकदा कमी पाणी पिऊ लागतो. कमी पाणी पिल्याने आपली त्वचा खूप कोरडी होते. अशी कोरडी त्वचा सुरकुत्या आणि क्रॅक होऊ लागते. ती फुटून सोलायलाही लागते.
तज्ज्ञांच्या मते, दररोज किमान 8-10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पुरेसे पाणी पिल्याने शरीरात ओलावा राहतो, ज्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते.
त्वचा आणि ओठ कोरडे आणि क्रॅक होतात - हिवाळ्यात आपण कमी पाणी पितो.शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ कोरडे आणि क्रॅक होतात जेणेकरून ते सहज फुटतात.
वजन वाढू शकते - पाणी कमी पिल्याने वजन वाढण्याचीही शक्यता असते .
टीप : नियमित पुरेसे पाणी न पिल्यास शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे हिवाळ्यातही पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे .