Cards Benefits For Hair : तुम्हीही केसांच्या समस्यांनी हैराण आहात का? तुम्हाला केसांच्या समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास 'या' गोष्टीचा वापर करा.
केसांशी संबंधित अनेक समस्यांनी बरेच लोक त्रस्त असतात. त्यामुळे लोक यावर विविध प्रकारचे उपाय देखील करतात. पण, अनेकदा ते उपाय फायदेशीर ठरत नाहीत. जाणून घ्या असाच एक रामबाण उपाय. (Photo Credit : Pexels)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथंडी आणि आर्द्रतेमुळे केस निर्जीव होऊन जास्त गळू लागतात. थंड वारा आणि कमी आर्द्रतेमुळे केसांची चमक कमी होते. जाणून घ्या ती कोणती वस्तू आहे जिचा वापर करून तुमच्या केसांशी संबंधी समस्या सुटतील (Photo Credit : Pexels)
हिवाळ्यात केसांच्या या समस्यांना तोंड देण्यासाठी केसांमध्ये फक्त दही वापरून केसांच्या सर्व समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळू शकते.(Photo Credit : Pexels)
प्रथिने, व्हिटॅमिन बी 5, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटक दह्यात आढळतात जे केसांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. (Photo Credit : Pexels)
केसांना दही लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. तसेच ते मजबूत आणि घट्ट होण्यास देखील यामुळे मदत होते. (Photo Credit : Pexels)
दही हे केसांचा कोरडेपणा दूर करण्यास मदत करते. त्याचबरोबर त्यांना हायड्रेटेड ठेवते. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड केसांची टाळू स्वच्छ ठेवते आणि कोंड्याची समस्याही कमी करते.(Photo Credit : Pexels)
दही हे केसांचे पीएच संतुलन राखण्यास मदत करते. याशिवाय केसांना कंडिशनिंग करण्यासाठीही दही उपयुक्त आहे. दही केसांना लावल्याने केस चमकदार आणि मुलायम होतात.(Photo Credit : Pexels)
केसांना दही लावण्यासाठी सर्वप्रथम केस चांगले धुवावेत. त्यानंरत एका भांड्यात दोन कप दही घ्यावे आणि केसांना नीट लावावे. (Photo Credit : Pexels)
हे दही केसांवर 20-30 मिनिटे राहू द्या, नंतर केस थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुवावेट. असे केल्याने तुमच्या केसांशी संबंधित सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.(Photo Credit : Pexels)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pexels)