Apple cider vinegar : औषधी गुणधर्म असलेले 'अॅपल सायडर व्हिनेगर' अनेक आजारांवर उपयुक्त...
अॅपल सायडर व्हिनेगर सफरचंदाच्या रसावर प्रक्रिया करून तयार केले जाते. या व्हिनेगरमधील अँटीऑक्सिडंट गुणधर्म आरोग्यास फायदे देतात. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअॅपल सायडर व्हिनेगरमुळे त्वचेवर येणाऱ्या पिंपल्सची समस्या दूर होते. त्वचेचं बॅक्टेरियल संसर्गापासून संरक्षण होते. (Photo Credit : unsplash)
पोटासंबंधीच्या समस्यांवर अॅपल सायडर व्हिनेगर रामबाण उपाय आहे. पोटफुगी, गॅस यांचा त्रास होऊ नये म्हणून जेवणापूर्वी अॅपल सायडर व्हिनेगर प्यावे. (Photo Credit : pixabay)
अॅपल सायडर व्हिनेगर मासिक पाळीमध्ये महिलांसाठी फायदेशीर ठरते. पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, चिडचिड अशा अनेक समस्या दूर होतात. (Photo Credit : unsplash)
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.अॅपल सायडर व्हिनेगरमुळे भूक नियंत्रणात राहते. (Photo Credit : unsplash)
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत, ते घशातील सूज दूर करण्यास मदत करतात. (Photo Credit : unsplash)
कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर फायदेशीर आहे, यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. (Photo Credit : unsplash)
अॅपल सायडर व्हिनेगर मधुमेहाच्या समस्येवर उपयुक्त आहे.शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास अॅपल सायडर व्हिनेगर मदत करते. (Photo Credit : pixabay)
दातांवरील पिवळटपणा दूर करण्यासाठी योग्य प्रमाणात व्हिनेगरचा वापर करावा. (Photo Credit : unsplash)
केसांच्या आरोग्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर फायदेशीर ठरते. केसांमधील कोंडा कमी करण्यास व्हिनेगरचा वापर केला जातो. केस मऊ आणि मजबूत होतात. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)