Health Tips : वजन कमी करण्यापासून ते कॅन्सरमुक्त होण्यापर्यंत चेरी टोमॅटोचे फायदेच फायदे...
चेरी टोमॅटो मोठ्या टोमॅटोपेक्षा किंचित लहान आणि चवीला गोड असतात. बऱ्याच लोकांना ते सॅलड्स आणि वेगवेगळ्या पदार्थांमध्ये समाविष्ट करायला आवडते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेरी टोमॅटोमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनॉइड्स आणि फिनोलिक संयुगे यांसारखे अँटिऑक्सिडंट्स आढळतात. ते व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी देखील समृद्ध आहेत. अनेक लोक या टोमॅटोचा आहारात विशेष समावेश करतात.
चेट्टी टोमॅटोमध्ये लाइकोपीनसारखे कॅरोटीनॉइड्स आढळत असल्याने ते खाल्ल्याने हृदयाशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होते.
जर तुम्हाला काही हेल्दी खाऊन वजन कमी करायचे असेल तर तुम्ही चेरी टोमॅटोचा आहारात समावेश करू शकता. कारण त्यात कॅलरीज कमी असतात.
उच्च रक्तदाबाचे रुग्णही चेरी टोमॅटोचे सेवन करू शकतात. कारण त्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते. चेरी टोमॅटो खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त सोडियम काढून टाकण्यास खूप मदत होते.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चेरी टोमॅटो कॅन्सरसारख्या घातक आजारांना रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. कारण त्यात व्हिटॅमिन सी बरोबरच बीटा-कॅरोटीन आणि मेलाटोनिन असते, जे कर्करोगाच्या पेशींशी लढतात आणि कर्करोगाचा धोका कमी करतात.
चेरी टोमॅटो हाडे निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. ऑस्टियोपोरोसिसचा धोका असलेल्या महिलांना त्यांचे सेवन केल्याने खूप फायदा होतो. याशिवाय त्यांच्यामध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील आढळतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.