Cherry Tomato Benefits : टॉमेटॉ नाही तर चेरी टॉमेटॉदेखील आहेत फायदेशीर, जाणून घ्या काय आहेत फायदे
अनेक जण चेरी टोमॅटो हे सॅलडमध्ये आणि वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेरी टोमॅटोमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनॉइड्स आणि फिनोलिक यांसारखे अँटिऑक्सिडंट्स आढळतात.
व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वे देखील चेरी टोमॅटोमध्ये असतात.
ते व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी देखील असतात. त्यामुळे अनेक जण आपल्या आहारामध्ये या टोमॅटोचा समावेश करतात
चेरी टोमॅटोमध्ये लाइकोपीनसारखे कॅरोटीनॉइड्स आढळत असल्याने हृदयाशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी चेरी टॉमेटॉ हे फायदेशीर ठरु शकतात. कारण यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते.
ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे ते देखील चेरी टोमॅटोचा आहारात समावेश करु शकतात. कारण यामध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते.
इतकचं नव्हे तर चेरी टोमॅटो हे कर्करोगासारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी मदत करु शकतात.
कारण यामध्ये व्हिटॅमिन सी सोबत बीटा-कॅरोटीन आणि मेलाटोनिन आढळतात, जे कर्करोगाच्या पेशींशी लढण्यास मदत करतात.
चेरी टोमॅटो हे हाडांना मजबूत करण्यास देखूल उपयुक्त ठरु शकतात.