Care For Cracked Heels : अशी घ्या पायांची काळजी, भेगांपासून मुक्त व्हा...
पायांवर सुरकुत्या येणे,टाचांवर भेगा पडणे अशा त्रासाला आपण सामोरे जातो.बरेच जण स्वतःच्या पायांकडे दुर्लक्ष करतात मात्र पायाची काळजी घेणे ही आवश्यक असते. त्यासाठी काही उपाय तुम्ही करू शकता [Photo credit :idahofoot.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाय स्वच्छ करावे: सर्व प्रथम तुमचे पाय कोमट साबणाच्या पाण्याने पाय धुवून घ्यावे ज्यामुळे घाण पूर्णपणे निघून जाईल.यानंतर,पायांवर मॉइश्चरायझिंग फूट क्रीम नक्कीच वापरा.[Photo credit :pexel.com]
गरम तेल:रात्री गरम तेलाने तळपायाची मालिश करावी जेणेकरून शांत झोप लागते.यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन पायांची आग कमी होते.[Photo credit :pexel.com][Photo credit :pexel.com]
पाणी आणि लिंबू:गरम पाण्यात लिंबू पिळून त्यात पाय काही वेळ सोडावेत जेणेकरून शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो.[Photo credit :pexel.com]
पायांना सनस्क्रीन,बॉडीलोशन लावणे :अनेकदा पाय टॅन होणे, पायावर सुरकुत्या दिसणे आणि पाय काळेही होतात अशा परिस्थितीत सनस्क्रीन तुमच्या पायाच्या त्वचेचे धोकादायक अतिनील किरणांपासून संरक्षण करते.[Photo credit :pexel.com]
रात्री सॉक्स वापरावे: रात्री झोपताना पायाला मॉइश्चराझर लावावे आणि त्यानंतर सॉक्स घालावे हे पायाची त्वचा मुलायम राहण्यासाठी फायद्याचे ठरते.[Photo credit :pexel.com]
शूज वापरणे: पायांची काळजी घेण्यासाठी शूज वापरावे ज्यामुळे पाय चांगले राहतात.पायांवर धुळ बसत नाही.[Photo credit :pexel.com]
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo credit :pexel.com]