Walking Barefoot : गवतावर अनवाणी पायाने चालणे आरोग्यासाठी फायदेशीर!
धावपळीच्या जीवनात आपण सर्वजण पूर्णपणे व्यस्त झालो आहोत. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, आपल्याला सर्वात जास्त निसर्ग उपचाराची गरज आहे. (Photo Credit : pexel.com)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्याला नेहमी अनवाणी चालण्याचा सल्ला दिला जात असतो कारण किमान रोज अर्धा ते एक तास अनवाणी चालण्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळत असतात. (Photo Credit : pexel.com)
नियमित अनवाणी चालल्याने डोळ्यांपासून ते हृदयापर्यंत त्याचा फायदा होतो त्यामुळे जुने जाणते लोक आपल्याला अनेकदा अनवाणी चालताना दिसतात. (Photo Credit : pexel.com)
आपण पृथ्वीच्या इलेक्ट्रॉन्सच्या संपर्कात आल्यावर त्यातून आपल्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात, त्याचाच एक भाग म्हणजे अनवाणी चालणे (Photo Credit : pexel.com)
गवतावर अनवाणी चालणे खूप फायदेशीर असते, असे केल्याने दृष्टी अधिक तेजस्वी होते कारण अनवाणी चालण्याने आपल्या पायाच्या तळव्यावरील दाब बिंदू पूर्णपणे सक्रिय होतात (Photo Credit : pexel.com)
पायाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटांमध्ये जास्तीत जास्त मज्जातंतूचा शेवट असतो, जो दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे अनवाणी चालल्याने रक्तदाबाची समस्याही दूर होते. (Photo Credit : pexel.com)
जेव्हा आपण जमिनीवर किंवा गवतावर अनवाणी चालतो तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके पूर्णपणे सामान्य असतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. (Photo Credit : pexel.com)
पहाटे उगवत्या सूर्यासोबत गवतावर किंवा जमिनीवर अनवाणी चालल्यामुळे सूर्यापासून व्हिटॅमिन डी देखील मिळतो. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून आपल्या शरीरातील अनेक आजार दूर होण्यास मदत होते (Photo Credit : pexel.com)
वजन कमी करण्यासाठी देखील अनवाणी चालणे फायदेशीर असू शकते कारण अनवाणी चालण्यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहत असते. (Photo Credit : pexel.com)