मधूमेह देखील होऊ शकतो ब्लड कॅन्सरचे कारण?
कर्करोग हा कोणत्याही वयोगाटातील लोकांना होऊ शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञांनी नुकतेच एक संशोधन केले आहे.त्यांनी मल्टीपल मायलोमावर हे संशोधन केले आहे.
या संशोधनातून असे दिसून आले आहे की मल्टिपल मायलोमा ग्रस्त लोकांमध्ये मधुमेह नसलेल्या लोकांपेक्षा एकंदर जगण्याचा दर कमी असतो.
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, 13% अमेरिकन लोकांना मधुमेह आहे आणि रोगाचा प्रसार वेगाने वाढत आहे.
युनायटेड स्टेट्समधील बहुसंख्य गैर-हिस्पॅनिक कृष्णवर्णीय प्रौढांना मल्टिपल मायलोमा आहे, जो दुसरा सर्वात घातक रक्ताचा रोग आहे.
मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये मल्टिपल मायलोमाचा धोका जास्त असतो, असं देखील संशोधनात म्हटलं आहे.
मल्टिपल मायलोमा आणि मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये जगण्याचा दर कमी असतो असं म्हटलं जातं.
त्यामुळे मधूमेह असणाऱ्या लोकांना ब्लड कॅन्सर होण्याची देखील शक्यता असते.
त्यामुळे या लोकांनी योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टर देतात.