Health Tips : फक्त गोळ्यांमध्येच नाही तर 'या' फळभाज्यांमध्येही आहे व्हिटॅमिन ई; पाहा फायदे
व्हिटॅमिन ई त्वचा आणि केसांसाठी आरोग्यदायी मानले जाते. एवढेच नाही तर व्हिटॅमिन-ई रक्तवाहिन्या रुंद करण्याचे काम करते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्हिटॅमिन ई आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. विशेषतः त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी व्हिटॅमिन ई खूप महत्वाचे आहे. आपल्यापैकी बरेच जण व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरतात.परंतु तुम्हाला माहित आहे का की या कॅप्सूलशिवाय इतर अनेक पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल व्यतिरिक्त इतर मुख्य स्त्रोत कोणते आहेत हे जाणून घ्या.
सूर्यफुलाच्या बियांपासून तयार केलेले तेल आणि बियांचे सेवन करा. यातून व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात मिळू शकते.
शरीरात व्हिटॅमिन ईच्या पुरवठ्यासाठी, शेंगदाणे किंवा पीनट बटर खा. यातून तुम्हाला खूप फायदा होईल.
बदाम हे व्हिटॅमिन ई चा खूप चांगला स्रोत आहे. यातून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.
भोपळा आणि भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई देखील मुबलक प्रमाणात आढळते.
किवी केवळ डेंग्यूमध्येच फायदेशीर नाही, तर त्यातून तुम्हाला व्हिटॅमिन ई देखील मुबलक प्रमाणात मिळेल.
फळांचा राजा आंबा हा व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे. आंब्याचे सेवन केल्याने तुम्हाला व्हिटॅमिन ई कॅप्सूल खाण्याची गरज भासणार नाही.
एवोकॅडो हा व्हिटॅमिन ई चा एक चांगला स्त्रोत मानला जातो. (Photo : Freepik)