Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग सुरु, शेकडो कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना
Jayakwadi Dam : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील धरणं जवळपास पूर्णपणे भरली असून, पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत (Godavari River) करण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळं जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) सद्या 90 हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरु आहे.
त्यामुळं धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तर गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग वाढवून दीड लाख करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
त्यामुळं पैठण शहरातील 620 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
जायकवाडी धरणाचे एकूण 27 दरवाजे उघडण्यात आले आहे. ज्यात 9 आपत्कालीन दरवाजांचा सुद्धा समावेश आहे. तर दीड लाख क्युसेकने पाणी सोडल्यास पुराचे पाणी पैठण शहरात घुसण्याची शक्यता असते. त्यामुळं पैठण नगरपरिषदेने अशा भागातील नागरीकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहे. तर काही नागरिकांचे स्थलांतर सुद्धा करण्यात आले आहे.
ज्यात 9 आपत्कालीन दरवाजांचा सुद्धा समावेश आहे.
तर दीड लाख क्युसेकने पाणी सोडल्यास पुराचे पाणी पैठण शहरात घुसण्याची शक्यता असते.
त्यामुळं पैठण नगरपरिषदेने अशा भागातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहे.
तर काही नागरिकांचे स्थलांतर सुद्धा करण्यात आले आहे.