अननसाचे 'हे' आरोग्यदायी फायदे एकदा वाचाच
अननसात फायबर भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखी पोषक तत्वदेखील असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदररोज सकाळी उठून अननसाचे पाणी प्यायल्याने आरोग्य उत्तम राहतं.
यासाठी हा उपाय करा. रात्री अननसाचे लहान काप करून त्याला काचेच्या पाण्यात रात्रभर ठेवा. अननसातील द्रव आणि पोषक तत्वे रात्रभर शोषली जातील.सकाळी उठल्याबरोबर हे पाणी गाळून प्या.
अननसामध्ये असलेले फायबर तुमचे वजन लवकर कमी करण्यास मदत होईल. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहील.
अननसाचे सेवन केल्याने तुमची पाचक प्रणाली बळकट होईल.
अननसाचे पाणी बॉडी डिटॉक्स करण्यासाठी मदत करतात. यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात.
अननसामध्ये असलेले मॅगनीज़ दात आणि हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त असतात.
अननसामध्ये बीटा-कॅरोटीन आणि क जीवनसत्व असते. यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
या व्यतिरिक्त, अननसामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.