New Year Lucky Zodiacs : 2025 मध्ये 'या' राशींना मिळणार बंपर लाभ, बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
पंचांगानुसार, नवीन वर्ष 2025 मध्ये ग्रहांचं संक्रमण या राशींसाठी खास ठरणार आहे. ग्रहांच्या चालीत बदल झाल्याने अनेक राशींना लाभ मिळणार आहे. 2025 च्या सुरुवातीला शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2025 मध्ये गुरु ग्रह बृहस्पतीसुद्धा वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर, अन्य छोटे-मोठे ग्रह देखील संक्रमण करणार आहेत. याचा शुभ प्रभाव अनेक राशींवर होणार आहे. या भाग्यशाली राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 मध्ये कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील.
तसेच, राहू आणि केतुचा प्रभावही कमी होईल. त्यामुळे 2025 हा काळ तुमच्यासाठी शुभ असणार आहे.
ग्रहांच्या स्थितीनुसार, तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष फार शुभकारक असणार आहे. शनीचे मीन राशीत प्रवेश केल्याने अनेक काळापासून सुरु असलेल्या तुमच्या अडचणी संपुष्टात येतील.
तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात सुख-समृद्धी टिकून राहील.
मकर राशीत अनेक काळापासून सुरु असलेली शनीची साडेसाती 2025 मध्ये संपणार आहे. तुम्ही तणामुक्त आयुष्य जगाल.
तसेच, तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली असेल. 2025 मध्ये अचानक धनलाभ होऊ शकतो.
2025 मध्ये शनी वृश्चिक राशीतून भ्रमण करुन शनीची साडेसाती कमी होणार आहे. त्यामुळे 2025 मध्ये तुम्हाला अनेक शुभ वार्ता मिळू शकतात. नोकरदार वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)