हिवाळ्यात सफेद तिळ खाण्याचे फायदे, अनेक समस्यांसाठी रामबाण उपाय
यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल आणि तुमचे वजनही नियंत्रणात राहील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यातील लोक सर्वात जास्त आजारी पडतात. खरे तर थंडीच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे अनेक प्रकारचे मौसमी आजार होतात.
अशा परिस्थितीत उष्ण स्वभाव असलेले पांढरे तीळ हिवाळ्यात खूप फायदेशीर असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
पांढरे तीळ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात. शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत असते तेव्हा सर्दी, खोकला, फ्लू यांसारख्या समस्या दूर राहतात.
पांढरे तीळ पोटासाठी खूप चांगले असल्याचे सांगितले जाते. थंडीच्या वातावरणात पचनक्रियाही कमकुवत होते.
अशा स्थितीत अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आदी समस्या उद्भवू लागतात. पांढऱ्या तीळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून आल्याने पचनसंस्था देखील सुधारते.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही पांढरे तिळ उपयुरक्त ठरु शकतात.
त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत पांढरे तिळ खाणं उपयुक्त असल्याचं म्हटलं जातं.
त्यामुळे संक्रांतींच्या दिवशी देखील पांढऱ्या तिळाचे लाडू बनवले जातात.
यामुळे शरीराला अनेक फायदे मिळण्यास मदत होते.