MNS Deepostav : मनसेच्या दीपोत्सवात अभिनेता विक्की कौशलची हजेरी, राज ठाकरेंकडून कौतुक; पाहा फोटो
मनसेच्या दीपोत्सावाचा शुभारंभ हा गुरुवार (9 नोव्हेंबर) रोजी झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील दादर भागातील शिवाजी पार्कात या दीपोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेते विक्की कौशल याने देखील हजेरी लावली.
त्याचबरोबर या दीपोत्सवाला राजकुमार हिराणी , अभिजीत जोशी , साजिद नाडियादवाला , आशुतोष गोवारीकर देखील उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी सपत्नी या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
यावेळी राज ठाकरे यांनी विक्की कौशलचे कौतुक देखील केले.
विक्की कौशल साकारणार असलेल्या छत्रपती संभाजीराजे या भूमिकेविषयी देखील राज ठाकरे यांनी भाष्य केलं.
दरम्यान मनसेच्या दीपोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.