PHOTO: गुलाबी थंडी, अशात हुरडा पार्टी; आरोग्यासाठी होणार असे फायदे
ज्वारीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असते,मॅग्नेशियम, कॉपर आणि नायसिन असते. त्यामुळे शरीरात पचन चांगले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहुरडा खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आजही हुरडा खाण्यासाठी पसंती दिली जाते. विशेष म्हणजे आता शहरात देखील हुरडा पार्ट्या रंगताना पाहायला मिळत आहे.
हुरडा चवीला अत्यंत स्वादिष्ट असतो.
ज्वारीचा हुरडा अँटी ऑक्सीडन्ट असल्याने, त्याचा उपयोग हृदयविकार आणि कर्करोग होऊ नये म्हणून केला जातो.
शरीरात कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हुरडा उपयोगी ठरतो.
ग्रामीण भागात सुरू झालेल्या या हुरडा खाण्याच्या पद्धतीला आता शहरी भागात देखील वाव मिळत आहे. अनेकजण स्वतःच्या किंवा मित्र मैत्रिणींच्या शेतात जाऊन हुरडा खाण्याचा आनंद घेतात.
आता व्यावसायिक हॉटेल आणि धाब्यावर देखील हुरडा पार्टीचे आयोजन केले जात आहे. तुम्ही सुद्धा तेथे जाऊन हुरडा खाऊ शकता.