Somvaar Upay : सोमवारी करावे शिव शंकराचे 'हे' अचूक उपाय; घरात नांदेल सुख-समृद्धी, कर्ज होईल दूर
शंकर देवाची पूजा करण्यासाठी सोमवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. सोमवारी केलेले निश्चित उपाय तुमच्या आयुष्यातील समस्या संपवू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी, सोमवारी तांदूळ, दूध आणि चांदीचे दान करा, असे केल्याने तुमच्या जीवनात सुख-शांती येईल आणि आर्थिक समस्याही दूर होतील.
कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी शिवलिंगावर तांदूळ पाण्यात मिसळून अर्पण करा. असे केल्याने कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळते.
सोमवारी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते.
शिवपुराणानुसार, गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला अर्पण करावेत. असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात. तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येते.
सोमवारी दान करणे शुभ असते. पांढरे कपडे, फुले, धान्य, मिठाई, दूध-दही, साखर मिठाई यासारख्या पांढर्या रंगाच्या वस्तूंचे सोमवारी दान करावे. यामुळे जीवनातील कष्ट दूर होतात.
भोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर सोमवारी व्रत अवश्य ठेवा. सोमवारी व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि प्रलंबित कामं पूर्ण होतात. जर तुम्ही कडक उपवास ठेवू शकत नसाल तर तुम्ही दिवसातून एकदाच फळे खाऊ शकता किंवा मीठ नसलेले अन्न खाऊ शकता.
सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी शिव मंदिरात रुद्राक्ष दान करावे. हा उपाय केल्याने पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येतो.
सोमवारी भगवान शंकराची आराधना करा आणि पूजेमध्ये तुमच्या आवडत्या वस्तू देवाला अर्पण करा. यावर भगवान शिव प्रसन्न होतात. भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी देवाला दूध, बेलपत्र, भांग, धोतरा, फुले आणि फळे अर्पण करा. यानंतर अगरबत्ती लावावी.
सोमवारी शिवलिंगावर दुधात केशर मिसळून अर्पण करा आणि 'ओम नमः शिवाय' मंत्राचा जप करा. हा उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होते.