Benefits of Nutmeg : जायफळ खाण्याचे फायदे, उपयोग जाणून घ्या?
पुरुषांना जायफळाची फारशी माहिती नसली तरी स्त्रियांना जायफळाची माहिती नक्कीच असते. अनेक प्रसंगी जयफळाचा वापर केला जातो. कधी मसाला म्हणून तर कधी मुलांना मसाज करण्यासाठी. जायफळ तेलाचा वापर साबण तयार करण्यासाठीही केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजायफळाचा वापर शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. जायफळाचा वापर करून बरेच आजार आपण टाळू शकतो.
याशिवाय लहान मुलांसाठीही जायफळाचे अनेक फायदे आहेत .जायफळ पावडर दररोज सकाळी १-२ ग्रॅम या प्रमाणात मुलांना दुधासोबत द्यावे . त्यामुळे मुलांची ताकद वाढते. मुलांचे आजारही बरे होतात.
अनेकदा महिलांना आपल्या लहान मुलांचे दूध सोडवण्यासाठीही जायफळ उपयुक्त ठरू शकते.
तोंडाचे व्रण बरे करण्यासाठी ताज्या जायफळाचा रस पाण्यात मिसळून धुवावा. यामुळे तोंडाचे व्रण बरे होते.
जायफळ बारीक करून त्यात मध घाला आणि तो लेप चेहऱ्यावर लावा त्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात.
टीप : हिवाळ्यात हात-पायांची त्वचा फाटते त्यासाठी जायफळ पावडर पाण्यात मिसळून पेस्ट करा आणि आपल्या हात आणि पायांवर चोळा यामुळे त्वचा फाटण्याची समस्या दूर होईल .