Ayurvedic Medicinal Plants: आजारावर मात करण्यासाठी उपयुक्त आहेत औषधी वनस्पती!
आजकाल वैद्यकीय क्षेत्रात अनेक संशोधनामुळे औषध शास्त्रात बदल झाले आहेत. त्यामुळे अनेक प्राचीन पद्धतींचा विसर पडला आहे. प्राचीन आयुर्वेदिक औषधी ही अनेक दुर्धर आजार बरे करण्यासाठी वापरले जाऊ शकतो याचा विसर पडल्याने ती वनस्पती आज नष्ट हो आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना पुर्नजीवीत करण्याची आवश्यकता भासू लागली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअश्वगंधा अश्वगंधाच वापर दररोज केल्यास मानसिकतेपासून ते शरीरातील अनेक आजारावर मत करण्यास मदत करते. आहारामध्ये अश्वगंधाचा वापर हा पावडर च्या स्वरुपात करावा. तसेच काही प्रमाणात फूल, पान बियांचा ही वापर होतो. याचे रोप प्रामुख्याने जंगलात आढळतो.
कोकम कोकमाच वापर दररोज आहारात केल्याने रोगप्रतिकरक शक्ती वाढण्यास मदत होते, पित्त प्रकृती नियंत्रण ठेवण्यास मदत करते, शरीराचे तापमान नियंत्रण ठेवते, पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करते, कोकम हृदयरोगासाठी उपयुक्त असून शरीरातील साखरेचे प्रमाण ही कोकमामुळे नियंत्रण राहते.
आवळा ज्यापध्यतीने चवीला गोड नसणारे पदार्थ हे शरीरासाठी जास्त गुणकारी असतात असे मोठ्यांकडून सातत्याने ऐकण्यात येते. त्याच पद्धतीने आवळा हा पदार्थ चवीला तुरट असले तरी तो शरीरातील प्रत्येक घटकांसाठी, केसांसाठी, चेहर्यासाठी अतिशय गुणकारी आहे.
शतावरी अश्वगंधा प्रमाणे शतावरी ही प्रत्येक आजारावर मत करण्यास मदत करते. लहान मुलांपासून प्रत्येक वयोगटातील नागरिक याचे सेवन करू शकतात. शतावरी हा पदार्थ बुद्धी च्या वाढीसाठी उपयुक्त असतो. म्हणूनच लहान मुलांची बुद्धी वृद्धिंगत होण्यासाठी याच्या पावडरचा वापर करतात.
पुनर्नव पुनर्नव ही एक लोप पावत जाणारी परंतु अतिशय गुणकारी अशी औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती अनेक दुर्धर आजारांवर मात करण्यास मदत करते. या वनस्पतीचा वापर विविध मसाला बनण्यासाठीही केला जातो. ही वनस्पती प्रामुख्याने भारताच्या ईशान्य राज्यांमध्ये आढळतो.
कडुलिंब कडूलिंब या वनस्पतीमध्ये विविध जीवनसत्त्वे खनिजांचा समावेश आढळतो. कडुलिंबाचा वापर प्रत्येक छोट्या मोठया आजारांवर मात करण्यासाठी केला जातो. सहज उपलब्ध होणारे वनस्पती आणि घरगुती उपचारासाठीचे वनस्पती म्हणून याकडे पाहिले जाते. याचे झाड असून ते कोठेही पहायल मिळते.
बेल बेल ही अशी वनस्पति आहे ज्याचे फळ हे आरोग्यासाठी वापरले जाते तर त्याच्या पानांचा वापर हा धार्मिक कार्यासाठी आणि सोंदर्यप्रसाधनासाठी वापर केला जातो. याचे झाड असून ते कोठेही पहायल मिळते.
कोरफड ग्रामीण आणि शहरी भागात सहज दिसणारी आणि सर्वांना परिचित वनस्पती म्हणून याकडे पाहीले जाते.या वनस्पतीचा वापर हा विविध केसांच्या समस्या आणि चेहऱ्यांच्या समस्येसाठी उपयुक्त ठरते. तसेच सौंदऱ्यासाठीचे उत्पादन म्हणूनही वापरले जाते.
हळद हळद हा प्रत्येकांच्या घरात सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे.हळदीचा वापर जेवणात केला जोतो त्याप्रमाणे त्याक वापर जखमेवर औषध म्हणून केले जाते. तसेच सोंदर्यप्रसाधन म्हणून केले जाते, केसांच्या विविध समस्या आणि चेहऱ्यांच्या समस्येसाठी उपयुक्त ठरते.
तुळस तुळस ही अशी वनस्पती जी प्रत्येक मराठी घराच्या दारामध्ये पाहायला मिळते. मराठी संस्कृतीमध्ये या वानस्पतीला एक वेगळ्या पद्धतीचे महत्व आहे. तुळस ही प्रत्येक छोट्या मोठया आजारांवर मात करण्यासाठी वापरला जातो.