सर्जरीमु्ळे ट्रोल झाली, टीव्ही इंडस्ट्रीला रामराम केला, 830 कोटींची कंपनी चालवते अभिनेत्री
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आशका गोराडिया चांगलीच लोकप्रिय आहे. तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. मात्र, जवळपास 20 वर्ष टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर आशकाने 2021 मध्ये आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला रामराम केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2003-05 मध्ये कुकुसुममध्ये कुकुमुदची भूमिका साकारून आश्का गोराडियाने लोकप्रियता मिळवली. 'कुसुम' आणि 'कहीं तो होगा' सारख्या शोमधून नाव कमावल्यानंतर तिने रिॲलिटी टीव्ही शोमध्येही प्रवेश केला आणि बिग बॉसमध्ये दिसली. मात्र, 2019 मध्ये आशकाने बिझनेसवुमन बनण्यासाठी इंडस्ट्री सोडली आणि आता ही अभिनेत्री करोडोंची कंपनी चालवते.
आशका गोराडियाने अचानकपणे टीव्ही इंडस्ट्रीला रामराम केल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला. मात्र, आशकाची व्यावसायिक जगतातील दुसरी इनिंग चांगलीच यशस्वी ठरली.
2018 मध्ये ओठांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पण आशकाने लोकांना उत्तर देताना सांगितले होते की, सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय माझा असल्याचे त्यांनी म्हटले.
2019 मध्ये, आशकाने अभिनय कायमचा सोडला आणि योगा आणि फिटनेससह तिच्या व्यवसाय उपक्रम, रेनी कॉस्मेटिक्सवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.
आशकाने 2002 मध्ये 'अचानक 37 साल' या शोच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. कुसुमसाठी तिला साईन करण्यात आले, हा तिचा मोठा प्रोजेक्ट होता. यामध्ये तिने कुमुद ही व्यक्तीरेखा साकारली होती.
कुसुम मालिकेमुळे आशका चांगलीच लोकप्रिय झाली. आशका गोराडियाने अनेक रिएल्टी शोमध्ये काम केले. आशकाने 'जेट सेट गो', 'कभी कभी प्यार कभी कभी यार', 'मिस्टर अॅण्ड मिसेज टीवी', 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 4', 'बिग बॉस 6', 'नच बलिए 8', 'किचन चॅम्पियन 5' आदी शोमध्ये ती झकळली.
वर्ष 2020 मध्ये आशकाने आपला मेकअप आणि ब्युटी ब्रँड रेनी कॉस्मेटिक लाँच केले. बिझनेस सुरू केल्याच्या दोन वर्षातच कंपनीचा टर्नओव्हर 820 कोटींचा झाला. आशकाने अमेरिकन व्यावसायिक ब्रेंट गोबलसोबत लग्नगाठ बांधली.