Wayanad Landslides : वायनाडमध्ये भूस्खलनाची घटना; दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी पुढे केला मदतीचा हात, कोणत्या कलाकारांनी किती दिली रक्कम
29 जुलैच्या रात्री उशिरा वायनाडच्या अट्टामाला, मुंडक्काई, चुरलमाला आणि नूलपुझा गावात भूस्खलनाची घटना झाली. यामध्ये वाहने, घरे आणि पूल वाहून गेले आहेत. वायनाडमधील घटनेची दृष्ये मनं हेलवणारी आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभूस्खलनाच्या घटनेनंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. भारतीय लष्करांच्या जवानांनी 1000 हून अधिक लोकांना वाचवले असून 3000 हून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. शेकडो लोकांचा मृत्यूही झाला आहे.
केरळवर ओढावलेल्या या नैसर्गिक आपत्तीनंतर मदतीचे हजारो हात पुढे आले आहेत. दाक्षिणात्य सेलिब्रिटी देखील यामध्ये मागे राहिले नाहीत.
दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या आणि ज्योतिका यांनी 50 लाख रुपये मदत निधी म्हणून दिले आहेत.
स्टार अभिनेता कार्थी याने देखील 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
'नॅशनल क्रश' रश्मिका मंदानाने देखील 10 लाख रुपयांचा मदत निधी जाहीर केला आहे. रश्मिका मागील आठवड्यात केरळमध्ये गेली होती. तिने एका शॉपिंग मॉलचे उद्घाटन केले होते.
अभिनेता चियान विक्रम याने वायनाडमधील भूस्खलन घटनेवर दु:ख व्यक्त केले असून 20 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली.