Unhealthy Foods: रात्री 'या' गोष्टी खाणं टाळा, होऊ शकतो अॅसिडीची त्रास
त्यामुळे आपली पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया पोटदुखीच्या त्रासामुळे बऱ्याचदा रात्रीची झोप देखील पूर्ण होत नाही आणि संपूर्ण दिवस खराब जातो.
हे पदार्थ दिवसा खाल्ल्यास त्याचा फारसा परिणाम होत नाही पण रात्री खाल्ल्याने त्याचा विपरित परिणाम शरीरावर होऊ शकतो.
त्यामुळे रात्रीच्या वेळी या पदार्थांचा आहारात समावेश करणं टाळलं पाहिजे.
भजी - रात्री तळलेली भजी खाणं टाळावं. भजीमध्ये फक्त तेलच नसते तर आम्लयुक्त पदार्थ देखील असतात. त्यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो.
संत्र - संत्र, लिंबू आयांसारखील फळं रात्री खाल्ल्यास त्रास होऊ शकतो. रात्री रिकाम्या पोटी ही फळ खाणं टाळावं.
चॉकलेट - जेवल्यानंतर काही गोड खाण्याची इच्छा होते. त्यामुळे बऱ्याचदा लोकं चॉकलेट खाता. पण चॉकलेट खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
पिझ्झा - रात्री चविष्ट काहीतरी खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेकदा पिझ्झा ऑर्डर केला जातो. पण हा हाय फॅट पिझ्झा खाल्ल्यानंतर अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
कॅफिन- कॅफीन म्हणजेच कॉफी किंवा चहा रात्री पिणं टाळावं. रात्री त्यांचे सेवन केल्याने पोटदुखीची शक्यता वाढते.