Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hairfall Remedies: केसगळती थांबवण्यासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी; साधी चूकही पडेल महागात
सुंदर, जाड आणि फुललेले केस कोणाला आवडत नाहीत? परंतु, सतत केस गळत राहिल्यामुळे डोक्यावर केसांपेक्षा जास्त टाळू दिसते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाढतं वय, मानसिक ताण, हार्मोन्सचा चढउतार, पोषक तत्त्वांची कमतरता, हवेतील प्रदूषण, आणि इतर शारीरिक आजार ही केस गळतीची काही मुख्य कारणं आहेत.
वातावरण, हवामान, केसांची निगा राखण्याचं रुटीन, हेअर केअर प्रोडक्ट्स आणि गरम उपकरणांचा केसांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केसगळती रोखण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
दिवसांनुसार केस न धुता, ते गरजेनुसार धुतले पाहिजे. केसात मळ दिसत असेल, चिकटपणा जाणवत असेल तर केस धुवा आणि केस स्वच्छ असतील तर धुवू नका.
केसांना कांद्याचा रस लावा, यामुळे केस मजबूत राहतात आणि केस गळणं थांबतं.
चुकूनही कंडिशनर टाळूवर (Scalp) लावू नका, फक्त केसांवर लावा. स्कॅल्पवर कंडिशनर लावल्याने केस खराब होतात.
केस ओले असताना विंचरणं टाळा, त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं.
झोपताना केस जास्त घट्ट बांधून झोपू नका, यामुळे केस मुळापासून उपटून तुटतात.
तुमच्या केसांच्या प्रकारानुसार हेअर प्रोडक्ट्स निवडा. तेलकट केसांवर ड्राय हेअर प्रोडक्ट्स किंवा कोरड्या केसांवर ऑयली हेअर प्रोडक्ट वापरल्यास केसांचं नुकसान होऊ शकतं.
कोरफड (aloevera gel) केसांचं गळणं थांबवण्यासाठी अतिशय परिणामकारक आहे. कोरफडीचा गर केसाला लावल्यास केस गळणं थांबतं तसेच केसांची वाढ होण्यास मदत होते.