Moon Mission: म्हणून केला जातोय अट्टाहास सारा, चंद्रावर जाण्याचं नेमकं कारण आलं समोर
भारत आणि रशियाने अलीकडेच त्यांची चंद्र मोहीम सुरू केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता संपूर्ण जगांच लक्ष हे भारताच्या चांद्र मोहिमेकडे लागलं आहे.
तर रशियाने देखील तब्बल पाच दशकांनी आपली दुसरी चांद्र मोहिम सुरु केली आहे.
तसेच 2030 च्या आधी अमेरिका आणि चीन आपली दुसरी चांद्र मोहिम सुरु करण्याच्या तयारीमध्ये आहेत.
पण चंद्रावर जाण्याचा इतका अट्टाहास का केला जात आहे हा प्रश्न सध्या सगळ्यांना पडत आहे.
वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार, चंद्रावर हेलियमचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे.
हा घटक पृथ्वीवर अगदी दुर्मिळ आहे. परंतु चंद्रावर त्याचे प्रमाण एक दशलक्ष टन असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच चंद्रावर पाण्याचा साठा असल्याचा अंदाज देखील वैज्ञानिकांकडून वर्तवण्यात येत आहे.
रशियाच्या लुना -25 या यानाचा मूळ उद्देश चंद्रावर आधी पाणी शोधण्याचा असल्याचं रशियाकडून सांगण्यात येत आहे.
तसेच भारताकडून देखील चंद्रावर पाणी आणि इतर खनिजांचा शोध लावण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.