Guava Benefits : पेरू तर सगळेच खातात, पण पेरूचे आश्चर्यकारक फायदे माहित आहे का?
पेरू फक्त खायलाच रुचकर नाही, तर त्यात अनेक पोषकतत्त्वे असतात, ज्यामुळे ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यापासून तुम्हाला काय फायदे होतात ते जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेंदूचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असलेली सर्व जीवनसत्त्वे पेरूमध्ये आढळतात. त्यात व्हिटॅमिन बी 3 आणि व्हिटॅमिन बी 6 असते जे मेंदूमध्ये रक्त परिसंचरण सुधारतात आणि तुमच्या मज्जातंतूंना आराम देतात.
पेरूमध्ये कॉपर असते जे हार्मोन्सचे उत्पादन आणि शोषणासाठी आवश्यक असते. हे आपल्या थायरॉईड ग्रंथीला चांगले कार्य करण्यास मदत करते.
पेरूमध्ये लाइकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट असतात जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. अँटिऑक्सिडंट्समुळे ते फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून सुरक्षित राहतात. त्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू हे उत्तम फळ ठरू शकते. कारण त्यात भरपूर फायबर असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हे दोन्ही गुणधर्म आवश्यक आहेत.
पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेला सुरकुत्यांपासून वाचवतात. जेणेकरून आपण तरुण दिसू लागतो. पेरू खाल्ल्याने वृद्धत्व चेहऱ्यावर लवकर दिसत नाही.
बद्धकोष्ठतेच्या समस्येवर पेरू खूप फायदेशीर ठरतो. कारण त्यात फायबर असते ज्यामुळे आतड्याची हालचाल सुलभ होते.
पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आढळते, जरी हे जीवनसत्व जास्त नसले तरी ते तुमच्या डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. व्हिटॅमिन सी यामध्ये आढळते, ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.