Sunroof Cars Under 10 Lakh : 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये सनरूफ कार, पाहा यादी
ग्राहकांच्या मागणीमुळे, आजकाल कार उत्पादक त्यांच्या वाहनांमध्ये प्रगत वैशिष्ट्ये पॅक करण्यात व्यस्त आहेत, ज्यामध्ये सनरूफ देखील त्यापैकी एक आहे. अशा बजेट वाहनांचा आम्ही पुढे उल्लेख करणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहिल्या क्रमांकावर टाटाची हॅचबॅक कार अल्ट्रोझ आहे. टाटा अल्ट्रोझ इलेक्ट्रिक सनरूफसह येणारी देशातील सर्वात परवडणारी कार आहे. टाटा कंपनी Tata Altroz XM Plus (S) व्हेरियंटपासून सनरूफ ऑफर करते. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.90 लाख रुपये आहे.
Hyundai ची नुकतीच लाँच केलेली मायक्रो SUV Xter ही इलेक्ट्रिक सनरूफ (SX प्रकार) सह येणारी देशातील सर्वात परवडणारी SUV बनली आहे.
Hyundai SUV Xter ची एक्स-शोरूम किंमत 8 लाख रुपये आहे.
सनरूफसह येणारी तिसरी बजेट कार Hyundai i20 हॅचबॅक आहे. कंपनी 9.04 लाख रूपये एक्स-शोरूम किमतीत आपला टॉप-एंड Asta प्रकार ऑफर करते.
चौथ्या क्रमांकावर, टाटाची लोकप्रिय SUV Tata Nexon सनरूफसह उपलब्ध आहे.
SUV Tata Nexon XM (S) व्हेरियंट 9.50 लाख रुपये एक्स-शोरूमच्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते.
या यादीतील पाचवी आणि शेवटची कार महिंद्रा XUV300 आहे. कंपनीने या कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ दिले आहे
महिंद्रा XUV300 ची एक्स-शोरूम किमती 10 लाख रुपये आहे.
या पाच स्वस्त कारमध्ये तुम्ही सनरुफचा आनंद घेऊ शकता.