ITR : आता फक्त 15 दिवसांचा वेळ उरलाय, जाणून घ्या किती लोकांनी भरलाय ITR , अंतिम तारखेनंतर भरावा लागेल इतका दंड!
आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 (Assessment Year) साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविभागानं आयटीआर भरण्यासाठी ऑनलाईन फॉर्म (Online Form) जारी केला आहे. अशा परिस्थितीत 31 जुलैपर्यंत वेळ आहे, असं समजून आयटीआर दाखल करण्यास अजिबात उशीर करू नका.
आयटीआर भरताना, लक्षात ठेवा की, यावेळी नवी कर प्रणाली डिफॉल्टमध्ये ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला जुन्या कर प्रणाली अंतर्गत आयटीआर फाईल करायचा असेल, तर तुम्हाला तो पर्याय स्वतःच निवडावा लागेल.
नव्या कर प्रणालीमध्ये कर सूट मिळविण्यासाठी खूप मर्यादित पर्याय आहेत. दरम्यान, 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न प्रभावीपणे करमुक्त करण्यात आलं आहे. तसेच, जुन्या कर प्रणालीमध्ये कर सूट मर्यादा वाढविण्यात आलेली नाही.
परंतु तिथे तुम्ही विविध सरकारी योजनांमध्ये आणि इतर मार्गांनी गुंतवणूक करून कर सवलतीचा दावा करू शकता.
प्राप्तिकर विभागाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी आतापर्यंत 22 दशलक्ष (2.2 कोटी) करदात्यांनी आयटीआर दाखल केला आहे.
आयकर विभागाने ठरवून दिलेली अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत करदात्याला आयटीआर भरता आला नाही, तर नंतर त्याला दंड भरावा लागेल.
या अंतर्गत, 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना 1,000 रुपये, तर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना 5,000 रुपये दंड आकारला जातो.
आयकर विभागाच्या ट्विटद्वारे करदात्यांना सूचित करण्यात आले आहे की ज्यांनी मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयटीआर भरला नाही त्यांनी शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी हे काम लवकरात लवकर करावे. (all photo credit:unsplash.com)