Health Benefits of Clove : इवल्याश्या लवंगाचे चमत्कारिक फायदे; 'असं' बनवा लवंगाचे पाणी

लवंगाचे आपल्याला अनेक फायदे मिळतात. त्यातून पुरूषांसाठीही त्यांचा सेक्शुअल स्टॅमिना वाढविण्यासाठी लवंग दिली जाते. त्यातून दातांच्या आरोग्यासाठीच नाही तर लवंगाचे असे अजून अनेक फायदे आहेत. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लवंग मदत करते.(Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सध्याच्या जीवनाता वाढत्या वजनाचा त्रास हा सगळ्यांनाच होत असतो तेव्हा लवंगाचे पाणी प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासोबत वजन कमी करण्यासह लवंग मदत करते. (Photo Credit : Pixabay)

सोबतच आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी लवंगाचे पाणी हे फायदेशीर ठरते. त्यातून तुम्हाला अपचन झाल्यासही लवंग मदत करते. तुम्ही वैद्यकीय सल्ल्यानूसार लवंगाचे पाणी पिऊ शकता. (Photo Credit : Pixabay)
त्यासोबत तुमच्या दातांचे आरोग्यही लवंगामुळे चांगले राहते. लवंगाचे पाणीच नाही तर तुम्ही नुसती लवंगही तोंडात टाकू शकता. यामुळे तुमच्या दातांना किड लागण्यापासून आणि ते खराब होण्यापासून लवंग बचाव करते. (Photo Credit : Pixabay)
लवंगामध्ये एन्टी एमफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे लवंगाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी हे फायेदशीर ठरते. त्यामुळे याचा आपल्याला फायदाही चांगलाच होतो.(Photo Credit : Pixabay)
लवंगाचे अति सेवन करू नका त्यातून लवंग ही फारच उष्ण असते. अशातच तिचे अति सेवन तुम्हाला महागात पडू शकते. किती प्रमाणात लवंग कधी खावी याबाबत जाणकारांचा सल्ला घ्या. (Photo Credit : Pixabay)
तुम्हाला श्वसनाचे काही त्रास असतील तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. दालचिनीनं रक्तदाब आणि ब्लड शुगरही नियंत्रित राहण्यास मदत होते. (Photo Credit : Pixabay)
तुम्ही घरच्या घरी देखील लवंगाचे पाणी पिऊ शकता. त्यामुळे त्याची प्रक्रिया आता आपण जाणून घेऊया. घरच्या घरी तुम्ही हे पाणी तयार करू शकता. (Photo Credit : Pixabay)
एका वाटीत 4-5 लवंग घ्या व त्या पाण्यात टाका. त्यानंतर हे पाणी उकळवा. त्यातून पाण्याचा रंग बदलला की तुम्ही हे पाणी थंड करू पिऊ शकता. (Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)