चिंताजनक! संपूर्ण पृथ्वीलाच प्रदूषणाचा विळखा, धक्कादायक अहवाल उघड
वाढत्या वायू प्रदूषणामुळे खोकला, घसादुखी, श्वसनासंबंधित आजार, डोळ्यात जळजळ, शरीरात थकवा जाणवणं यासारख्या अनेक समस्या निर्माण होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाढतं वायू प्रदूषण ही धोक्याची घंटा आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात याबाबत एक धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
या अभ्यासानुसार, जगात अशी कोणतीही जागा शिल्लक नाही जिथे हवा स्वच्छ आणि शुद्ध आहे. दिवसेंदिवस हवा अधिकाधिक विषारी होत आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. जगातील केवळ 0.0001 टक्के लोकसंख्या कमी प्रदूषित हवेत जगत आहे. वर्षभरातील 70 टक्के दिवसात हवा प्रदूषित राहते.
पीएम (PM) म्हणजे हवेतील विविध कणांचे त्यांच्या व्यासानुसार म्हणजेच आकारानुसार वर्गीकरण केलं जातं. यासाठी PM हे एकक वापरलं जातं.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, कोणत्याही माणसासाठी शरीरात दररोज प्रवेश करणारे पीएम 2.5 हवेचे कण 15 पीजी/एम3 पेक्षा जास्त नसावेत. दरम्यान हे प्रमाण 2000 ते 2019 या वर्षात सरासरी दुप्पट होतं.
'द लॅन्सेट' (The Lancet) जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात वायू प्रदूषणाच्या समस्येवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आलं आहे. या अहवालामध्ये जगभरातील वायू प्रदूषणाचा अभ्यास आणि गणना करण्यात आली आहे.
संपूर्ण पृथ्वीवरील हवेच्या प्रदूषणाचा अभ्यास करणारा हा पहिला अहवाल आहे. मोनाश युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने या अहवालासाठी पुढाकार घेतला. त्याचा अहवाल नुकताच 'द लॅन्सेट' जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
हा अभ्यास 65 देशांमधील 5446 मॉनिटरिंग स्टेशन्समधून घेतलेल्या डेटाच्या आधारे करण्यात आला, यामध्ये पूर्व आशिया सर्वात प्रदूषित असल्याचं आढळून आलं आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आशिया आहे. सर्वात कमी प्रदूषण उत्तर आफ्रिकेमध्ये आहे.
वातावरणातील बदलाचा परिणाम वायू प्रदूषणावरही होतो. उत्तर पश्चिम चीन आणि उत्तर भारतात हिवाळ्यात पेट्रोल-डिझेलमुळे प्रदूषण वाढतं.
त्याच वेळी, जंगलातील आगींमुळे उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर उन्हाळ्यात वायू प्रदूषण वाढतं. यामुळे तेथील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खराब होते.