Almonds : बदामाचे फक्त फायदे माहित आहेत, तर मग याचे तोटे पण जाणून घ्या

पण याचे केवळ फायदे नसून अनेक तोटे देखील आहेत. ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्या लोकांना बदामामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

बदामामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे किडनी स्टोन असलेल्या लोकांनी भरपूर प्रमाणात बदाम खाल्ले तर त्यांना त्रास होण्याची शक्यता असते.
बदामामध्ये फायबर जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
कच्चे बदाम जास्त प्रमाणात खाऊ नयेत. कारण जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्याने तोंडाला त्रास होऊ शकतो.
घसा खवखवणे आणि ओठ सुजणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
बदामामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते. जर ते जास्त प्रमाणात खाल्ले तर शरीराला लोह आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्व मिळवण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
जर तुम्हाला वारंवार ऍसिडिटीची त्रास होत असले तर बदाम कमी प्रमाणात खावेत.
कारण यामुळे ऍसिडिटीचा त्रास आणखी वाढण्याची शक्यता असते.
त्यामुळे जास्त बदाम न खाण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देखील दिला जातो.