Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Headache Home Remedies : सतत डोकेदुखीचा त्रास होतो आहे? 'हे' घरगुती उपाय करा
अनेकांना डोकोदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक वेळा सकाळी झोपेतून उठल्यानंतरही डोकेदुखीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
काही लोक डोकेदुखीसाठी पेनकिलर घेतात तर काही लोक बाम लावून आराम मिळवण्याचा प्रयत्न करतात.
परंतु प्रत्येक वेळी असे केल्याने आराम मिळेलच असे नाही. अशा परिस्थितीत काही डोकेदुखीचे घरगुती उपचार तुमची समस्या क्षणार्धात नाहीशी करतील.
जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर गरम पदार्थांचे सेवन केल्याने आराम मिळतो.
कॅफिन किंवा कोणत्याही गरम पदार्थाच्या सेवनाने तणाव कमी होतो आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो.
आले चघळल्यामुळे डोकेदुखी कमी होऊ शकते.
डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तेल थोडे गरम करून मसाज करा.
काही योगासने आहेत ज्यामुळे डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. योगाबरोबरच मान आणि खांद्याचा हलका व्यायाम केल्यानेही डोकेदुखी दूर होते.
शरीराला योग्य विश्रांती मिळाली तर अनेक समस्या आपोआप दूर होतात.