Happy Friendship Day 2023 : फ्रेंडशिप डे का साजरा केला जातो, जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व
फ्रेंडशिप डे हा दिवस हा दिवस मित्रांना समर्पित आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज सगळीकडे फ्रेंडशिप डे साजरा केला जातोय. हा दिवस मित्र-मैत्रींणींप्रती प्रेम, आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.
तुमच्या जीवनातील त्यांचे महत्त्व सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी मैत्री दिन साजरा केला जातो. मलेशिया, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड स्टेट्स आणि बांगलादेशसह भारतासारख्या देशांमध्ये हा ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. तर इतर अनेक देशांमध्ये तो 30 जुलै रोजी साजरा केला जातो.
अनेक वर्षांपासून फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. 1958 मध्ये पहिल्यांदा फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला. 30 जुलै 1958 रोजी पॅराग्वेमध्ये आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.
संयुक्त राष्ट्रसंघाने 2011 मध्ये 30 जुलै हा अधिकृत आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून घोषित केला. पण भारतासह अनेक देश ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.
मैत्री हे एक सुंदर नातं आहे ज्यात वयाचं, रंगाचं, जातीचं बंधन नसतं. म्हणून आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने तुमच्या खास मित्रांचं कौतुक करा. तुमच्या आयुष्यात त्यांचं किती महत्त्व आहे हे त्यांना सांगा आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवा.
आयुष्यात मित्रांचे महत्त्व पटवून देण्यासाठी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. आजच्या दिवशी तुम्ही खास भेटवस्तू देऊन तुमच्या मित्र-मैत्रीणींना स्पेशल फील करू शकता.