Eye Care: चष्मा लावताना नेहमी लक्षात ठेवा 'या' 6 गोष्टी; डोळ्यांचं आरोग्य राहील चांगलं
जेव्हा तुम्ही चष्मा बनवतात तेव्हा फक्त UV संरक्षित (UV Protected) चष्मा बनवा, यामुळे तुमचे डोळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचू शकतात. तुमच्या डोळ्यांचं आरोग्य यामुळे चांगलं राहील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक जण बिना चेकअप करताच जुन्या नंबरवरूनच नवीन चष्मा बनवतात. पण असं करणं हानिकारक आहे. तुम्ही दर 6 महिन्यांनी डोळ्यांची तपासणी केली पाहिजे आणि त्यानंतरच नवीन चष्मा बनवला पाहिजे.
पैसे वाचवण्यासाठी अनेकदा लोक चष्म्याच्या दुकानातूनच डोळ्यांचा नंबर तपासतात. पण चष्म्याच्या दुकानात डोळ्याचा योग्य नंबर सापडत नाही आणि तुम्हाला डोकेदुखी, अंधुकपणा, कोरड्या डोळ्यांचा त्रास होतो. त्यामुळे डॉक्टरांकडूनच डोळ्यांची तपासणी करून घेण्याचा प्रयत्न करा.
काही लोक इतरांचा चष्माही वापरतात. पण हे आवश्यक नाही की जर तुम्ही इतरांच्या चष्म्यातून स्पष्टपणे पाहू शकत असाल तर तो तुमच्या डोळ्यांसाठी योग्य असेलच. त्यामुळे असं केल्यास तुमचे डोळे खराब होतात आणि इन्फेक्शनचा धोकाही असतो.
तुमचा चष्मा नेहमी स्वच्छ ठेवा, जेणेकरुन तुम्ही स्पष्टपणे समोरचं पाहू शकाल. चष्मा नियमितपणे स्वच्छ करण्यासाठी नेहमी लेन्स क्लिनर सोल्यूशन आणि मऊ कापड सोबत ठेवा आणि त्यानेच चष्मा स्वच्छ करा.
काही लोक पैसे वाचवण्यासाठी कमी दर्जाचे चष्मे (Low Quality Specs) खरेदी करतात, ज्यामुळे डोळ्यांवर खूप परिणाम होतो. कानाच्या मागे वेदना होतात. नाकाजवळ डाग पडतात आणि त्यामुळे डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही चष्मा खरेदी कराल तेव्हा चांगल्या दर्जाचा चष्मा घ्या.