Health Benefits Of Halim : शरीराच्या अनेक आजारांवर अळीव ठरतील रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे..

अळीवमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असते. अळीव खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. अळीवामध्ये अँटिऑक्सिडंटचे गुणधर्म आहेत, जे रक्तशुद्धी करण्यास मदत करतात. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अळीवच्या बियांचे सेवन केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. अळीवमुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस तुटत नाही. तसेच केसांमधील कोंडाही कमी होण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)

अळीवच्या सेवनामुळे त्वचेवरील काळे डाग, सुरकुत्या कमी होतात. तसेच त्वचा निरोगी आणि चमकदार राहते. अळीवचे पाणी त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. (Photo Credit : unsplash)
लहान मुलांना कोरडा खोकला होत असल्यास अळीव रामबाण उपाय आहे. बाळंतीणीला दूध वाढण्यासाठी हळीवाचे लाडू मदत करतात. (Photo Credit : unsplash)
लठ्ठपणाची समस्या असल्यास अळीव खावे. अळीवमध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर असतात. वजन कमी करण्यासाठी रोज अळीवचे पाणी प्यावे. (Photo Credit : unsplash)
अळीवमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. अळीव खाल्ल्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. तसेच बराच वेळ भूक देखील लागत नाही. (Photo Credit : unsplash)
अळीवच्या बियांचे सेवन केल्यास हाडे मजबूत होतात. तसेच स्नायू बळकटही होतात. अळीव खाल्ल्याने ॲनिमियाची समस्या दूर होते. (Photo Credit : unsplash)
अळीव बिया मूळव्याधीवर फायदेशीर ठरतात, त्यामुळे रक्तस्त्राव कमी होतो. अळीव आपली स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)
अळीवमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पोटाशी संबंधित समस्यांवर फायदेशीर ठरतात. बद्धकोष्ठता आणि गॅस या समस्यापासून आपण दूर राहतो. (Photo Credit : unsplash)
यकृताच्या आरोग्यासाठी अळीव गुणकारी ठरतात. दम्याचा त्रास होत असल्यास अळीव खावे, त्यामुळे फुफ्फुसांचे कार्य सुधारते. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)