Man Dhaga Dhaga Jodte Nava : 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेतील 'आनंदी' दिसणार नव्या रुपात!
Man Dhaga Dhaga Jodte Nava : सासुबाईंनी दिलेलं चॅलेंज स्वीकारत आनंदी पुन्हा सासरी करणार गृहप्रवेश...
सासुबाईंनी दिलेलं चॅलेंज स्वीकारत 'आनंदी' पुन्हा सासरी करणार गृहप्रवेश... (Photo credit : Instagram/@star_pravah)
1/10
स्टार प्रवाहवरील मन धागा धागा जोडते नवा मालिकेतल्या सार्थक-आनंदीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. (Photo credit : Instagram/@star_pravah)
2/10
सार्थक आनंदीवर जीवापाड प्रेम करतो. आपल्या प्रत्येक कृतीतून आनंदीवरचं प्रेम आणि तिच्याविषयी वाटणारा आदर तो व्यक्त करत असतो. (Photo credit : Instagram/@star_pravah)
3/10
सार्थक सारखा समजून घेणारा आणि चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये खंबीरपणे पाठीशी उभा रहाणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य सुखकर होतं याची अनुभूती ही मालिका पाहताना होते. (Photo credit : Instagram/@star_pravah)
4/10
घटस्फोटानंतरही प्रत्येकाला आपलं आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचा अधिकार आहे हा विचार पटवून देणारी ही मालिका म्हणूनच प्रेक्षकांना जवळची वाटते. (Photo credit : Instagram/@star_pravah)
5/10
सार्थकने जरी आनंदीला पत्नीचे हक्क दिले असले तरी राजाध्यक्ष कुटुंबाने मात्र तिला मनापासून स्वीकारलेलं नाही. (Photo credit : Instagram/@star_pravah)
6/10
सार्थकच्या आग्रहाखातर आता त्याच्या आईने आनंदीला सून म्हणून सिद्ध करण्याची एक संधी देण्याचं ठरवलं आहे. (Photo credit : Instagram/@divyasubhashpugaonkar_official)
7/10
आनंदीने देखील हे आव्हान स्वीकारलं असून पुन्हा एकदा सन्मानाने ती सासरी गृहप्रवेश करणार आहे. स्वत:मध्ये सकारात्मक बदल करत आनंदी आयुष्याची नव्याने सुरुवात करणार आहे. (Photo credit : Instagram/@divyasubhashpugaonkar_official)
8/10
नव्या रुपात आणि नव्या आत्मविश्वासाने तिने स्वत:ला सिद्ध करायचं ठरवलं आहे. (Photo credit : Instagram/@divyasubhashpugaonkar_official)
9/10
सार्थकच्या साथीने आनंदी हे नवं आव्हान कसं पूर्ण करणार हे मालिकेच्या पुढील भागांधून पाहायला मिळेल. (Photo credit : Instagram/@divyasubhashpugaonkar_official)
10/10
त्यासाठी पाहायला विसरु नका मन धागा धागा जोडते नवा सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर. (Photo credit : Instagram/@divyasubhashpugaonkar_official)
Published at : 03 Feb 2024 09:29 AM (IST)