Monsoon Kitchen Tips: पावसाळ्यात कांदे-बटाट्यांना मोड येतात किंवा ते लवकर सडतात? हे टाळण्यासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
कांदे-बटाट्यांचा वापर हा सर्वच घरांमध्ये केला जातो. परंतु पावसाळ्यात बऱ्याचदा त्यांना कोंब फुटतात किंवा ते लवकर सडतात. हे टाळण्यासाठी काही टिप्स पाहूया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकांदे-बटाटे उबदार ठिकाणी ठेऊ नका. पावसाळ्यात शक्यतो हवेशीर ठिकाणी कांदे-बटाटे साठवून ठेवा, यामुळे त्यांना लवकर कोंब फुटणार नाही. उबदार ठिकाणी कांदे-बटाटे ठेवल्यास ते सडतात.
कांदा आणि बटाटा हे नेहमी वेगवेगळे ठेवावे, त्यासोबत इतर कोणती फळं किंवा भाज्या ठेऊ नये. कांदा आणि बटाटा सुद्धा वेगवेगळा ठेवावा, कारण आर्द्रतेमुळे त्यांना कोंब फुटतात.
फ्रिजमध्ये कांदे-बटाटे ठेऊ नका. फ्रिजमध्ये ओलावा असल्यामुळे तिथे कांदे-बटाटे लगेच खराब होऊ शकतात. फ्रिजमध्ये बटाटे मऊ पडतात आणि त्याला कोंब फुटतात.
फ्रिजमध्ये अर्धा चिरलेला कांदा किंवा बटाटा मुळीच ठेऊ नका. शक्यतो कांदे-बटाटे बाहेर हवेशीर जागी साठवून ठेवा.
सुती कापडामध्ये किंवा सुती कापडाच्या पिशवीत कांदे-बटाटे ठेवा, त्यामुळे हवा खेळती राहते आणि कांदे-बटाटे खराब होत नाहीत.