Hair Care Tips : सुंदर आणि चमकदार केस हवे आहेत? कोकोनट हेअर मास्क वापरून पाहा
नारळाच्या तेलाचे फायदे सर्वांनाच माहित आहे. नारळाचं तेल आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. ( PC : istockphoto )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहागड्या केमिकलयुक्त प्रसाधनांचा वापर करण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी कोकोनट हेअर मास्क बनवू शकता. यामुळे तुम्हाला जास्त पैसे खर्चही करावे लागणार नाहीत आणि नैसर्गिकरित्या केसांचे आरोग्य सुधारण्यासही मदत होईल. ( PC : istockphoto )
खोबरेल तेलामुळे केसांना पोषण मिळतं. तेलामुळे केसांतील कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. ( PC : istockphoto )
एका भांड्यात पाणी गरम करून घ्या. दुसऱ्या वाटीत खोबरेत तेल घेऊन ती वाटीत गरम पाण्याच्या भांड्यात ठेवा. तेल फक्त कोमट करा, उकळवू नका. ( PC : istockphoto )
एका पॅनमध्ये तुमच्या केसांना पुरेल एवढं खोबरेल तेल आणि त्याच्या 1/4 पट आणि मध घाला. तेल आणि मध एकत्र होईपर्यंत दोन्ही मंद आचेवर गरम करा. ( PC : istockphoto )
आता हे मिश्रण कोमट होऊ द्या उकळवू नका. स्प्रे बाटलच्या साहाय्याने केस ओले करा आणि हे मिश्रण केसांना नीट लावा. हा हेअर मास्क 40 ते 50 मिनिटे ठेवा आणि नंतर केस धुवा. ( PC : istockphoto )
एका वाटीत खोबरेल तेल गरम करून घ्या. एक टीस्पून बादाम तेल आणि दोन ते तीन चमचे ॲलोवेरा जेल मिसळा. ( PC : istockphoto )
हे मिश्रण चांगले एकजिव करा. तयार मास्क केसांना लावा आणि सॉवर कॅफने केस झाकून घ्या. 30 मिनिटांनंतर केस धुवा. ( PC : istockphoto )
एक अंडे फेटून त्यामध्ये खोबरेल तेल मिसळून चांगल्याप्रकारे मिसळा. आता हे मिश्रण ओलसर केसांवर लावा आणि शॉवर कॅपने केस झाका. ( PC : istockphoto )
हे मास्क 20 ते 30 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवा. यानंतर शॅम्पू आणि कंडिशनर करा. ( PC : istockphoto )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. ( PC : istockphoto )