Diwali 2024: यावेळी दिवाळीला द्या ८ प्रकारचे वेगवेगळे गिफ्ट!
दिवाळी अगदी जवळ आली आहे आणि जर तुम्ही अजूनही तुमच्या प्रियजनांसाठी योग्य भेटवस्तू शोधण्यात अडकले असाल, तर लगेचच या गोष्टींचा विचार करा आणि त्यांना हे गिफ्ट्स द्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसेंटेड मेणबत्त्या : सेंटेड मेणबत्त्या देणं हा सर्वात चांगला पर्याय आहे. सुगंधित केंडेल्स ने घरात पॉसिटीव्हिटी येते.
वॉल आर्ट/पेंटिंग्ज: जेव्हा दिवाळी येते तेव्हा विविध प्रकारचे पेंटिंग्स लोक देत असतात नवीन कलाकृतींमध्ये प्रयोग करायला आवडणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही भेटवस्तू शोधत असाल, तर वॉल पेंटिंग हा योग्य पर्याय असू शकतो.
डायनिंग सेट: अगदी नवीन डायनिंग सेट कोणाला आवडत नाही. जसजसा सणासुदीचा काळ जवळ येतो तसतसे आपल्या सर्वांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपल्याला उत्सवासाठी भेट देत असतात.
स्टोरेज ऑर्गनायझर्स: भारतीय घरांमध्ये जिथे जागा नेहमीच समस्या असते. त्यामुळे स्टोरेज ऑर्गनायझर्स ने लोकांना या गोष्टीचा हि फायदा होता.
वॉल क्लॉक किंवा टेबल क्लॉक : पारंपारिक घड्याळे आणि घड्याळांना पर्याय म्हणून फोन वापरण्याची आपल्याला सवय झाली आहे अशा काळात, स्टेटमेंट वॉल किंवा टेबल क्लॉक दिवाळी भेट देण्याचा एक अनोखा पर्याय बनवतात.
शो पीस: घराच्या सजावटीचे शो पीस हे दिवाळीसाठी सर्वात टिकाऊ भेटवस्तू आहेत.
स्वीट्स ,ड्रायफ्रुटस हॅम्पर : दिवाळीमध्ये स्वीट्स आणि ड्रायफ्रुटस नसतील तर दिवाळी अपुरीच असते. तुम्ही ड्राय फ्रूट्स, चॉकलेट्स, मिठाई आणि काही चवदार पदार्थ जसे की सॉल्टेड कुकीज आणि क्रॅकर्स यांचे मिश्रण करून हॅम्पर बनवू शकता.
इको फ्रेंडली गिफ्ट्स : तुम्ही या दिवाळीत तुमच्या जवळच्या व्यक्तींना काहीतरी पर्यावरणपूरक भेट देण्याचा विचारही करू शकता. यामध्ये टोट बॅग्ज, ज्यूट बास्केट, हाताने बनवलेले साबण.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )