Father's Day 2023 : या 'फादर्स डे'ला आपल्या वडिलांना द्या 'ही' भेट, साजरा करा वडिलांसाठीचा दिवस
या फादर्स डे दिवशी तुमच्या वडिलांना भेट देण्यासाठी तुम्ही या गोष्टींचा विचार करुन शकता. जाणून घेऊया सविस्तर याविषयी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुंतवणूकीचा पर्याय - तुम्ही तुमच्या वडिलांसाठी एखादी गुंतवणूक करु शकता. ज्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना त्याचा फायदा मिळण्यास मदत होईल.
सहलीची योजना - वडिलांसाठी तुम्ही एखाद्या छोट्या सहलीची देखील योजना करु शकता. त्यामुळे त्यांना थोडा निवांतपणा मिळू शकतो.
मोबाईल - या फादर्स डेला तुम्ही तुमच्या वडिलांसाठी मोबाईल देखील खरेदी करु शकता आणि त्यांना भेट म्हणून देऊ शकता.
वडिलांच्या आवडत्या कलेशी संबंधित भेटवस्तू - या फादर्स डे ला तुम्ही वडिलांच्या आवडत्या कलेशी संबंधित एखादी भेटवस्तू देऊ शकता. जसे की, पुस्तकं, रेडिओ इत्यादी.
नवी गाडी - जर तुमचे बजेट चांगले असेल तर तुम्ही वडिलांसाठी नवी गाडी देखील घेऊ शकता.
कस्टमाईज्ड गिफ्ट - तुमच्या बजेटमधले एखादे कस्टमाईज्ड गिफ्ट देखील तुम्ही वडिलांना देऊ शकता. जसे की, फोटोफ्रेम, कॉफी मग वैगरे.
घड्याळ - वडिलांना भेट म्हणून देण्यासाठी साधे घड्याळ किंवा स्मार्टवॉचचा देखील पर्याय आहे.
निवांत वेळ - या फादर्स डे वडिलांसोबत निवांत वेळ घालवणे देखील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरु शकते. त्यामुळे या फादर्स डे ला तुमच्या वडिलांसोबत निवांत वेळ घालवा.