PHOTO : हार, पुष्पगुच्छ न स्वीकारण्याचा फडणवीस यांचा नियम, कार्यकर्त्यांनी शोधला पर्याय
मागील काही महिन्यांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिखित नियम केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसार्वजनिक कार्यक्रमात गेल्यानंतर पुष्पगुच्छ किंवा हार स्वीकारणार नसल्याचा तो नियम आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या कार्यक्रमाला जातात तिथे शासकीय प्रोटोकॉलनुसार आलेले जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक इतर आधिकारी तसेच आमदार, खासदार आणि कार्यकर्ते हे पुष्पगुच्छ घेऊन किंवा हार घेऊन येत असतात
लातूर जिल्ह्यात काल असंच घडले होते. लातूर विमानतळावरील हार, पुष्पगुच्छ घेऊन आलेल्या सर्वांना त्यांनी सांगितलं की आपण पुष्पगुच्छ आणि हार स्वीकारणार नसल्याचा नियम केला आहे.
त्यावर तात्काळ एका कार्यकर्त्याने गुलाबाचे फुल काढून देत पर्याय आहे असे सांगितलं आणि तिथे एकच हशा पिकला.
देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्येकाकडून एक गुलाबाचे फूल स्वीकारत शुभेच्छांचा स्वीकार केला.
आकर्षक सुंदर पुष्पगुच्छ घेऊन आलेल्या आमदार आणि कार्यकर्त्यांवर त्या पुष्पगुच्छामधील एक फूल काढून देत फडणवीस यांचं स्वागत करण्याची वेळ आली.
तुळजापुरातील कार्यक्रमातही त्यांनी पुष्पगुच्छ आणि हार स्वीकारला नाही.
आपल्या नेत्यांबरोबर पुष्पगुच्छ देताना किंवा हार घालताना फोटो काढण्याची धडपड करणारे कार्यकर्ते अनेक असतात. अशा कार्यकर्त्यांना आता पुष्पगुच्छाऐवजी एकच फुलाचा उत्तम पर्याय मिळाला आहे