Ghee Benefits : मधुमेहाच्या रूग्णांनी साजूक तूपाचं सेवन करावं; शरीराला 'हे' फायदे मिळतात
मधुमेहाच्या रुग्णांना अनेक खाद्यपदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. पण, तूप सारखे काही खाद्यपदार्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुपाचे सेवन केल्याने ग्लुकोजच्या पातळीवर अजिबात परिणाम होत नाही, त्यामुळे मधुमेहाने त्रस्त असलेले लोक कोणतीही भीती आणि काळजी न करता सहजपणे तूप आपल्या आहाराचा भाग बनवू शकतात.
तुपामुळे भरपूर चरबीयुक्त अन्न पचणं सोपं होतं, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
तूप हेल्दी फॅट मानले जाते, जे विद्राव्य जीवनसत्त्व शोषण्यास मदत करते.
तूप हे व्हिटॅमिन के आणि इतर अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करते.
उच्च कार्बोहायड्रेट अन्नामध्ये तुपाचा समावेश केल्यास ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. एवढेच नाही तर तुपामुळे रक्तातील साखरेची अचानक वाढ रोखता येते.
तूप आतड्याचे आरोग्य सुधारते. हे हार्मोन्सचे व्यवस्थापन करण्यास देखील मदत करते. याशिवाय ते इन्सुलिन स्राव नियंत्रित करण्याचे काम करते.
तुपामध्ये व्हिटॅमिन डी असते, जे कॅल्शियम शोषण्यासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका होऊ शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.